Congress activists Join Ncp Jalna Sarkarnama
मराठवाडा

काॅंग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच; जालन्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

(Jalna Congress activists Join Ncp)सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला

सरकारनामा ब्युरो

जालना ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यांसारखी शहरे राष्ट्रवादीमय करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असे जयंत पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले.

राजेश टोपे यांनीही उपस्थितांशी संवाद साधत आपला पक्षा हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन केले. आगामी निवडणुकीत आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

सुधाकर निकाळजे यांच्यासह विजय बनकर, नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते राजू दळे, भिमशक्तीचे रोहिदास गंगातिवारे, संतोष उन्हाळे, कैलास बनसोडे, भिमसेना पँथर पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर अख्तर, भिमशक्तीच्या जिल्हाध्यक्षा विशाखा सिरसाळ, धामगांवचे सरपंच अनिल साळवे, चिनेगाव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी तायडे, कामगार नेते दिपक दांडगे, आरपीआयचे विजेंद्र दवंडे, उद्योगपती श्याम शिरसाट यांचा यात समावेश आहे.

बसपा, सपाच्या कार्यकर्त्यांचाही प्रवेश

बसपाचे शरद पवार, घनसावंगी विधानसभा सदस्य शेख बशीर शेख शमशोद्यीन, सेलगावचे ग्रामपंचायत सदस्य निलेश सोनावणे, समाजवादीचे ॲड. शेख वसीम शेख नबी-सिपोराकर, कांतीलाल हिवाळे, बाबासाहेब खरात, निलेश काकडे, कैलास गवई, निलेश डोलारे, रवी गायकवाड, अमोल तुपे, चंद्रकांत सोनावणे, ॲड. विनोद डिगे -जाफ्राबाद, संदिप गाडगे, शिवाजी चौहान, मांडवा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोरे, अभिषेक डिगे, बाळकृष्ण हिवाळे, सुनीता गायकवाड, रंजना राजेगावकर, शारदा गवई यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परभणीतील गंगाखेड आणि आता जालना जिल्ह्यात राष्ट्रवादीने काॅंग्रेसला धक्का दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT