पैठण : पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विलासबापू संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ पैठण येथे मंत्री अब्दुल सत्तार यांची सभा पार पडली. यावेळी खासदार संदिपान भुमरे यांच्यासह मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. भुमरे साहेबांचा जर मला पाठिंबा नसता तर आज एक मुस्लिम समाजाचा माणूस या छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री झाला नसता.
भुमरे साहेबांनी कुठल्याही प्रकारचा जातिवाद केला नाही. आज मी ज्या पदावर आहे त्यामागे माझ्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आशीर्वाद तर माझ्यासोबत आहेच, परंतु ज्यावेळेस मी उमेदवार होतो त्यावेळेस भुमरे साहेबांनी मला मोलाची साथ दिली. म्हणून त्यावेळेस मी २५ हजार मताधिक्याने निवडून आलो आणि या वेळेसही मी उमेदवार असल्या कारणाने आणखीन शिल्लक मताधिक्य घेऊन निवडून येईल, अशी आशा बाळगतो.
आता माझं कर्तव्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास बापू संदिपान भुमरे यांना जरी माझा पाठिंबा असला तरी मतदानाचे बटन तुमच्या हातात राहणार आहे. सर्वांनी आपापली जबाबदारी समजून दमदार, शानदार आणि काम करणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडके विलास भुमरे यांच्या म्हणजेच विकासाला साध द्या.
जिल्ह्यात पैठणची जागा पहिल्या क्रमाकांने निवडून आणा, असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, जीतसिंग करकोटक, सोमनाथ परदेशी, अजीम कटारी, नंदु अण्णा काळे, शिवराज भुमरे, तसेच शिवसेना- भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचंड संख्येने नागरिकांची उपस्थिती यावेळी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.