Parli Sugar Factory News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Parli Sugar Factory News : सूर जुळले, परळी कारखान्याच्या अध्यक्षपदी पकंजा, तर उपाध्यक्ष पद धनंजय मुंडे गटाला..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : एकाच घरातील बहिण-भाऊ पण राजकारणात एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजपच्या पकंजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे सुर अखेर जुळले आहेत. (Parli Sugar Factory News) परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने या दोघांनी राजकीय वैर बाजूला सारत एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे २१ संचालक मंडळाच्या कारखान्यात पकंजा मुंडे यांचे ११ तर धनंजय यांच्या गटाचे १० संचालक बिनविरोध निवडले गेले.

त्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड देखील बिनविरोध करत मुंडे-बहिण भावांनी राजकारणात सहकाराचा नवा पॅटर्न रुजवला आहे. वैद्यनाथच्या चेअरमनपदी (Pankaja Munde) पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदी (Dhnanjay Munde) धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. दोन महिन्यांपुर्वी भगवान बाबा गडावर महंत नामदेव शास्त्री यांच्या साक्षीने मुंडे बहिण-भावांनी कटुता दूर करण्याचा संकल्प केला होता.

त्याची सुरूवात जवाहर एज्युकेशन सोसयटीच्या निवडणुकीपासून झाली होती. त्यानंतर पुन्हा या दोघांनी आपापल्या राजकीय दिशा आणि विचार वेगळे असल्याचे दाखवत टीका, आरोप-प्रत्यारोप सुरू केले होते. (Beed News) बाजार समितीच्या निवडणुकीत ते प्रकर्षाणे दिसून आले. पण वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत या दोघांचे एकमत झाले होते.

हा कारखाना वाचवण्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कारखाना पुन्हा सुरु व्हावा म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यात दोघांनाही यश आले. संचालक मंडळ बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील बिनविरोध होणार आणि त्यावर पंकजा आणि धनंजय मुंडे गटाच्या व्यक्तीची निवड अपेक्षितच होती. प्रत्यक्षात घडलेही तसेच.

आज अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीत अध्यक्षपदी पंकजा मुंडे, तर उपाध्यक्ष पदासाठी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी चंद्रकात कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साखर कारखान्याच्या निवडणुकीतून पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या नात्यात आलेला हा गोडवा भविष्यातही कायम राहणार? की मग लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे एकमेकांच्या विरोधात उभे राहणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT