Pankaja Munde vs Dhananjay Munde News
Pankaja Munde vs Dhananjay Munde News Sarkarnama
मराठवाडा

vaidyanath Sugar Factory News : पंकजा-धनंजय मुंडेंचे ठरले, वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोधच होणार..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : भगवान गडावर एकमेकांबद्दलची कटुता नाहीसा करण्याचा केलेला संकल्प पंकजा आणि धनंजय मुंडे या बहिण भावांकडून पुर्णत्वाकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (vaidyanath Sugar Factory News) राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने काम करण्याचा निर्णय पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनीही घेतल्याची चर्चा आहे.

त्यामुळे निवडणुकीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी माघारीच्या दिवसापर्यंत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झालेले असले, अशी माहिती आहे. (Beed News) जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीपासून सुरू झालेला कटुता कमी करण्याचा प्रयोग वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत देखील यशस्वी होतांना दिसतो आहे.

पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थीत असलेल्या (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी देखील तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्हा आणि राज्याच्या राजकारणासाठी पंकजा आणि धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्यातील दिलजमाई ही दिलासा देणारी गोष्ट ठरणार आहे. भगवान गडावर मुंडे बहिण भावांनी केलेल्या भाषणानंतर राज्यात अनेक चर्चा झाल्या.

दोघांमधील कटुता संपणार असे चित्र रंगवले जात असतानांच पुन्हा दोघांनी एकमेकांवर टीका करायला सुरूवात केली. त्यामुळे कटुता संपवण्याचा संकल्प केवळ स्वप्नच ठरते असे वाटू लागले. परंतु जवाहर शिक्षण संस्था आणि त्यापाठोपाठ वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या होवू घातलेल्या निवडणुकीत पुन्हा चित्र बदलले. आता राजकीय संघर्ष टाळत समन्वयाने राजकारण करण्याचा नवा पॅटर्न बीड जिल्ह्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीपासून त्याला सुरूवात झाली असेच म्हणावे लागेल. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. यात ५० पैकी १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यात नाथरा गटातून पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. परंतु त्यांचा महिला गटातील दुसरा अर्ज वैध ठरला आहे.

तर नाथरा गटातून अजय मुंडे, राजेश गित्ते, सतिष मुंडे व सहकारी संस्था मधून सत्यभामा आघाव बिनविरोध निवडले गेले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंति मुदत १८ मे असून त्याच दिवशी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्काबोर्तब होण्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडे यांच्या गटाला २१ पैकी ११ जागा व आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाला १० जागा देण्याचा फाॅर्म्युला ठरला असून यावर लवकरच मोहर उठवली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT