Pankaja And Dhananjay Muned In Cabinate News Sarkarnama
मराठवाडा

Cabinet Expansion News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा 'मुंडें'चा आवाज; धनंजय-पंकजा पहिल्यांदाच एकत्र मंत्रीमंडळात!

Pankaja- Dhananjay Munde sister-brother included in the cabinet :धनंजय मुंडे यांना मात्र रविवारी दुपारपर्यंत होल्डवर ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती. रविवारी दुपारी एकच्या सुमारास धनंजय मुंडे यांना पक्षाकडून फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

Jagdish Pansare

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ : अनेक शंका-कुशंका, उलटसुलट चर्चांनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात पुन्हा एकदा 'मुंडें'चा आवाज घुमणार हे स्पष्ट झाले आहे. (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांची आधी विधान परिषदेवर निवड आणि आता मंत्रीमंडळात समावेश करत पक्षाने खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन केले आहे. तर दुसरीकडे ऐन मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील अपहरण, खंडणी प्रकरणामुळे विरोधकांच्या रडारवर असलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर बाजी मारलीच.

शेवटच्या क्षणी मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी हजर राहण्या संदर्भात अजित पवारांकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना फोन करण्यात आला. राज्याच्या राजकारणात या निमित्ताने पंकजा आणि धनंजय मुंडे बहिण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र मंत्रीमंडळात काम करणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघाला दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने इथे पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे. मुंडे-बंधु भगिणी दोघे आज नागपुरात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्तारात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच बीड, मराठवाड्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे सायंकाळी नागपुरात होणाऱ्या मंत्री मंडळाच्या विस्तारात शपथ घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना शनिवारी (ता.14) मध्यरात्री पक्षाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण मंत्रीमंडळात सहभागी होणार असल्याचा फोन केला होता. यामुळे शहरातील भाजपचे पदाधिकारी पहाटेच नागपूर कडे रवाना झाले होते.

तर धनंजय मुंडे यांना मात्र रविवारी दुपारपर्यंत होल्डवर ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती. रविवारी दुपारी एकच्या सुमारास धनंजय मुंडे यांना पक्षाकडून फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. कारण जिल्ह्यातील मस्साजोग येथे देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागते की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण विरोधकांनी संपूर्णपणे धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

तसेच संभाजीराजे छत्रपती, शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनीही अजित पवार यांना विनंती केली होती की, देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पद देवू नये, त्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबद्दल अनिश्चितता होती. पंकजा मुंडे यांचे नाव मंत्रीमंडळाच्या यादीत फिक्स असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सकाळपासूनच फटाके फोडण्यास सुरुवात केली होती. दुपारच्या सुमारास धनंजय मुंडे शपथ घेणार असे कळताच त्यांच्या समर्थकांनीही एकच जल्लोष केला. दरम्यान परळी विधानसभेच्या इतिहासात प्रथमच मुंडे कुटुंबात दोन कँबीनेट मंत्री पदे मिळणार असल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT