बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्या अंबेवेस भागातील हाॅटेलमध्ये नेहमी चहा घ्यायचे तिथेच सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही चहा घेतला. सहकाऱ्यांसोबत गप्पागोष्टींबरोबरच त्यांनी हॉटेलचालकाची विचारपूसही केली.
पंकजा मुंडे रविवारी जिल्ह्यात पोचल्या असून बुधवार पर्यंत त्या परळीत थांबणार आहेत. रविवारी त्यांनी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडाला भेट देऊन बीडमध्येही काही काळ थांबल्या. त्यानंतर आजपासून तीन दिवस त्या परळीतच असणार आहेत.
विशेष म्हणजे त्यांचा हा दौरा परळी मतदार संघातील जनता व कार्यकर्त्यांसाठीच राखीव असून बाहेरील लोकांसाठी त्या मुंबईत भेटणार असल्याची टिप त्यांच्या दौरा पत्रिकेत स्पष्ट लिहली आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी अंबेवेस भागातील प्रकाश खोत यांचे म्हाळसाकांत हॉटेल गाठले.
सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांसमवेत चहाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थितांनी दिवंगत मुंडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. प्रकाश खोत यांचे वडिल दिवंगत मुंडे यांचे समर्थक होते. याच हॉटेलमध्ये मुंडे नेहमी येऊन चहा घेत. पंकजा मुंडे यांनी खोत यांच्याशी आपुलकीने संवाद साधून विचारपूस केली.
भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, नगरसेवक पवन मुंडे, महादेव इटके, नरेश पिंपळे, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, मोहन जोशी, विकास हालगे, सुशील हरंगुळे आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.