Pankaja Munde Banner News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Banner : मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप; पंकजा मुंडेंचा निषेध...

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मात्र दोन्ही समाजात भांडणे लावू नयेत असे त्यांनी म्हटले आहे.

Jagdish Pansare

Beed Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे सर्वत्र जोरदार स्वागत झाले. आज यात्रा त्यांच्या स्वजिल्ह्यात येत असतानाच त्यांच्या निषेधाचे बॅनर झळकले. (Pankaja Munde Banner News) तेलगाव (ता. धारूर ) येथील चौकात लावलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे नमूद करत निषेध व्यक्त करण्यात आला. सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने हे बॅनर लावण्यात आल्याचे बोलले जाते.

दोन महिने राजकीय सुटीवरून परतल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देवदर्शनाननिमित्त शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. यात्रेचे राज्यभर भव्य स्वागत होत असून यात्रेला मोठा प्रतिसाददेखील मिळाला आहे. (Beed) दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटे येथे उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेल्या समाज बांधवांवरील लाठीहल्ल्याचा पंकजा मुंडे यांनी निषेध केला.

आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीने जोर धरला आहे. (Maratha Reservation) याच मागणीवर जरांगे पाटील ठाम असून, त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. यावर पंकजा मुंडे यांनीही आपले मत मांडले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मात्र दोन्ही समाजात भांडणे लावू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.

यानंतर पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे नमूद करत त्यांचा निषेध करणारे बॅनर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आले. राज्यभरात भव्य स्वागत झालेल्या पंकजा मुंडे यांना आपल्याच जिल्ह्यात मात्र विरोध आणि निषेधाला तोंड द्यावे लागत असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे. एकीकडे शिवशक्ती परिक्रमा यात्रेच्या स्वागताची भाजपने तयारी केली आहे, तर दुसरीकडे निषेधाच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT