Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : दोन्ही कराड, ठाकूरांना पंकजांचा टोला; 'पद दिलेले मेळाव्यापासून दूर पण जनता सोबत'

Pankaja Munde Dasara Melava Bhagwangad Speech : पंकजा मुंडे यांनी भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना फटकारले आहे.

Datta Deshmukh

Beed Politics News : पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत सहभागी होणारे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड व विधान परिषदेचे आमदार रमेश कराड तसेच आमदार सुरजितसिंह ठाकूर यांना पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष फटकारले. पदे मिळालेले मेळाव्यापासून दूर असले तरी जनता सोबत असल्याचा टोला या वेळी पंकजा मुंडे यांनी लगावला.

संत भगवानबाबांचे जन्मगाव सावरगाव घाटा येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यातील भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी नाव न घेता तिघांना टोला लगावला. दिवंगत मुंडे यांच्या काळापासून व पुढेही पंकजा मुंडे यांच्या सत्तेच्या काळात प्रत्येक कार्यक्रमात भागवत कराड, रमेश कराड व सुरजितसिंह ठाकूर अग्रभागी असत. मुंडेंचे कट्टर समर्थक अशी या तिघांची ओळख होती, पण पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी मागच्या काळात भागवत कराड यांना राज्यसभा व केंद्रीय राज्यमंत्रिपद, रमेश कराड यांना विधान परिषद, सुरजितसिंह ठाकूर यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि त्यांना मुंडेंपासून बाजूला केले. मेळाव्यात तिघेही नव्हते. यामुळे पदे मिळालेले मेळाव्यापासून दूर गेले असले तरी जनता सोबत असल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी नाव न घेता लगावला.

'भगवानबाबा की, आवाज देशात पोचला पाहिजे'

भगवानबाबा की जय, अशा घोषणांना प्रतिसाद मिळताना हा आवाज देशात पोहोचला पाहिजे, अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी घातली. बसलेल्यांनो उठू नका, अशी शपथही त्यांनी या वेळी उपस्थितांना घातली. भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील भाषणासाठी पंकजा मुंडे उठताच जोरदार घोषणांना सुरुवात झाली. या वेळी उपस्थितांना कुठून आलात, विदर्भातून कोण आले, पश्चिम महाराष्ट्रातून कोण आलेय, उत्तर महाराष्ट्रातून कोण आलात, येवल्यातून कोण आले, सिन्नरमधून कोण आले, असे विचारून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांनो उभे असलेले खाली बसून घ्या. कोणीही उठू नका, अशी माझी शपथ असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. या वेळी भगवानबाबा की जय अशा घोषणांना प्रतिसाद घेताना ‘आवाज देशात पोचला पाहिजे, अशी सादही त्यांनी घातली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT