Pankaja Munde news in Marathi, Beed News, Beed Politics News sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Live : पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

Pankaja Munde Live : पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही असेही पंकजा म्हणाल्या.

सरकारनामा ब्युरो

आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे, हे कार्यकर्त्यांना वाटते. त्यात त्यांचे काय चुकले, असा सवाल पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात केला. मला राग नाही, लोभ नाही. मी खूर्चीसाठी राजकारणात असते, तर येथे दोन लोकही नसते, असे त्या म्हणाल्या. भाषण करताना पंकजा या भावुक झाल्या. त्यांच्या भाषणानंतर समर्थकांनी गोंधळ केला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गोंधळ का झाला, याचे काऱण अद्याप समजलेले नाही. (Savargaon Dasara Melava 2022)

Pankaja Munde

गर्दी माझी शक्ती आहे. गर्दी हीच माझी ताकद आहे, हे मला जेपी नड्डा यांनी सांगितले. मी थकणार नाही, झुकणार नाही, संघर्ष कुणालाही चुकला नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा वारसा चालवते. गोपीनाथ मुंडे यांचे विचार अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखेच आहे. मी भाजपच्या संस्कारात वाढले आहे.

एकदा आपण समर्पण केले. 2024 ला निवडणूक आहे. समर्पणाची ताकद आपण दाखवून देऊ. ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून समुद्र दाखवून देऊ. स्वाभीमानाची ताकद दाखवून देऊ. ठिक आहे, पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही असेही पंकजा म्हणाल्या. तुम्ही आपापल्या मतदारसंघात जा, आपली वज्रमुठ आवळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे ही मागणी मी केली आहे. माझा मेळावा हा कष्टकऱ्यांचा मेळावा आहे. चिखल तुडवणाऱ्यांचा हा मेळावा आहे. मी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. मी संघर्ष करुन मोठी झाली. मी कधीही कुणासमोर झुकणार नाही. संघर्ष माझ्या रक्तात आहे.

मला काहीही मिळाले नाही याचे दुःख मला नाही. समाजाच्या हितासाठी जे होत असेल ते मला मान्य आहे. समाजाला बांधायचे सोडून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही. मी क्षमाशील आहे, पण तुम्ही त्याला क्षमा करणार नाही याची मला खात्री आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, महादेव जानकर मेळाव्यास उपस्थित आहेत. मेळाव्यास मुंडे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

सावरगाव (बीड) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यास सुरवात झाली आहे. दसरा मेळाव्या निमित्त खासदार डॉ. प्रितम मुंडे (Pritam Munde) यांच्या नेतृत्वाखालील वाहन फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. जागोजागी कार्यकर्त्यांनी डॉ. मुंडे यांचे जंगी स्वागत केले.

प्रीतम म्हणाल्या, संघर्ष करो या घोषणा बंद करा. संघर्ष कुणालाच चुकला नाही. गोपीनाथ मुंडेंसारखा भगवान बाबांचा भक्त तुमच्या-आमच्यातला माणूस होऊन गेला. भगवान बाबांनीही खूप संघर्ष केला, पण त्यांनी सत्य सोडले नाही. मुंडे साहेबांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. चाळीस वर्षांच्या राजकारणात फक्त साडेचार वर्षे सत्ता मिळाली. संघर्ष खूप होता असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT