Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Dasara Melava Speech : पंकजा मुंडेंनी परळीसाठी पुन्हा रणशिंग फुंकले; ही सीट लढा, ती सीट लढा, असं चालणार नाही

Vijaykumar Dudhale

Beed News : इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा. प्रीतम मुंडे घरी बसतील, तुम्ही लढा. असलं मला काहीच चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही, असे सांगून माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतून निवडणूक लढविण्याचे रणशिंग पुन्हा फुंकले. (Pankaja Munde Dasara Melava Speech: Pankaja Munde's announcement to re-contest from Parli)

दसऱ्यानिमित्त भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी इतर मतदासंघातून निवडणूक लढविण्यास नकार देत सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. या मेळाव्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, रमेश आडसकर आणि मान्यवर उपस्थित होते.

इकडची सीट लढा, तिकडची सीट लढा. प्रीतम मुंडे घरी बसतील, तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा. असलं मला काहीही चालणार नाही. कारण मी कुणाच्याही मेहनतीचं खाणार नाही. एकवेळ मी मेहनत करेन. तुम्ही म्हणाल तर ऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन. पण, मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही.

पडणार नाही, आता मी पाडणार

मी पडले तो आता इतिहास आहे, पण आता मी पाडणार आहे. जे चरित्रहीन आहे, पैशाच्या जोरावर सर्वकाही करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला मी पाडणार आहे. सर्वसामान्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी मी लढा देणार आहे. माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंतर देणार नाही. मी आता मैदानात आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तिकडून कोणीही हटवू शकणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी आमच्या लेाकांचं भलं आहे, त्याच ठिकाणी पंकजा मुंडे नतमस्तक होईल. पराभवानंतर मध्य प्रदेश, परळी काम केलं आहे. लोकांच्या मनात सध्या प्रश्न आहेत. त्याचं प्रश्नाचं उत्तर मी गेल्या काही दिवसांपासून शोधत आहे. तुमच्या मनातील उत्तर काय आहे, मला माहिती आहे. पण मी तुमची ताई नसून आई आहे. त्यामुळे माझ्या लोकांचं हित पाहणं, त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT