Pankaja Munde, Dhanjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News: बीडमधून मोठी अपडेट; मंत्री पंकजा मुंडे 'अ‍ॅक्शन मोड'वर; पोलिसांना दिले 'हे' महत्त्वाचे आदेश

Beed Crime News : राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड पोलिस प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

Deepak Kulkarni

Beed News : गेल्या काही महिन्यांपासून बीडचं नाव राज्याच्या राजकारणात चर्चेत आलं आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलं होतं. यानंतर एकापाठोपाठ एक गुन्हेगारीच्या गंभीर घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. यात एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अ‍ॅक्शन मोडवर आल्या आहेत.

बीडमधील(Beed) संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याआधी वाढत्या गुन्हेगारीच्या बीडच्या घटनांनी हादरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. यानंतर त्यांनी गुन्हेगारांना सज्जड दम भरला होता. तसेच गुन्हेगारांना कारवाईचा इशाराही दिला होता. पण आता बीडमधून गायी तस्करीचा एक गंभीर प्रकार समोर आल्यानं मंत्री पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड पोलिस प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित आरोपींना तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी माजी मंज्ञी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात चोरट्यांनी धुमाकुळ घातल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे.

परळीतील स्नेहनगर भागात गुंगीचे औषध देऊन गायींना चोरण्याचा धक्कादायक प्रकार चोरट्यांकडून करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. गायींना गुंगीचं औषध देऊन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गायी तस्करीच्या घटनांची गंभीर दखल घेतली असून त्यांनी आता बीड पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. संबंधित आरोपींचे धाबे दणाणणार आहे. शहरातील स्नेहनगर भागात शुक्रवारी (ता.25) रात्री गायींना खाण्याच्या पदार्थांमधून गुंगीचं औषध देण्याचा धक्कादायक व संतप्त प्रकार उघडकीस आला होता.

यावेळी चोरट्यांचा गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न होता. स्थानिक नागरिकांकडून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंत्री पंकजा मुंडे यांच्या कानावर हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक आणि स्थानिक पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच पंकजा मुंडे यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना संबंधित गायींवर त्वरीत उपचार करण्याच्या निर्देशही दिले. यामुळे चार गायींवर जीवदान दिलं. अजून एका गायीवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT