Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : पराभव झाला तरी पंकजा मुंडे खासदार होणार?

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : लोकसभा निवडणुकीत भाजपने उदयनराजे भोसले, नारायण राणे पीयूष गोयल या राज्यसभेवरील खासदारांना उतरवले. भाजपची ही खेळी यशस्वी झाली असून हे तीनही उमेदार आता लोकसभेचे सदस्य झाले आहे. मात्र बीड लोकसभेची विश्वासाची जागा गमावल्याचे भाजपला दुःख आहे. येथून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. पक्षात वजन असलेल्या पंकजा मुंडेंना आता भाजप राज्यसभेवर पाठवणार का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

निवडणुकीत अनेक इच्छुकांना डावलून भाजपने राज्यसभेचे खासदार नारायण राणे, उदयनराजे भोसले Udayanraje Bhosle आणि पीयूष गोयल यांना रिंगणात उतरवले. त्यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळवला आहे. त्यामुळे राज्यसभेतील या जागा रिक्त झालेल्या आहेत. या रिक्त जागांवर भाजप लोकसभेत संधी मिळाली नाही, अशा नेत्यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजांचाही यात समावेश असण्याची चर्चा आहे. आता या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, 2019 पासून पंकजा मुंडे Pankaja Munde भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांना यापूर्वीच राज्यसभा, विधानपरिषदेत स्थान मिळण्याची आशा होती. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने रिंगणात उतरवले. मात्र त्यांचा साडेसहा हजार मतांनी निसटता पराभव झाला. मुंडेंचा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. बीड जिल्ह्यात त्यांना बळ देण्यासाठी भाजप त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लावली. आता भाजप राज्यसभेवर कुणाला पाठवणार, याचीच चर्चा सुरू झालेली आहे.

राज्यसभेची निवडणूक 25 जून रोजी होत आहे. ही निवडणूक केरळच्या तीन आणि महाराष्ट्रातील एक अशा चार जागांसाठी होणार आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने घोषणाही केलेली आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल पटेलांनी राजीनामा दिलेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जून आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 18 जून आहे. तर 25 जून रोजी निवडणूक होणार असून सायंकाळी निकाल लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT