Minister Pankaja Munde inaugurates Mahapashudhan Expo in Parli Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde: 'अजितदादा असते तर....; महापशुधन एक्सपोच्या उद्घाटनावेळी पंकजा मुंडेंना प्रकर्षानं झाली आठवण

Mahapashudhan Expo Parli News : परळीतील महापशुधन एक्सपो उद्घाटनावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली. शेतकरी व तरुणांनी पशुधन व्यवसाय व अनुदान योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Jagdish Pansare

Beed Politics News : परळीत भरवण्यात आलेल्या आजच्या या महापशुधन एक्सपो ची संकल्पना अजितदादांना निश्चितच आवडली असली. त्यांनी याबद्दल आमचे कौतुक केले असते आणि आम्हाला काही सूचनाही दिल्या असत्या, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत अजित पवार यांची आठवण काढली. यापुर्वी अशाच प्रदर्शनात माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर आली होती. आज अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आल्याबद्दल दुःख वाटत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून परळी येथे आयोजित 'महापशुधन एक्सपो' या राष्ट्रीय स्तरावरील पशू प्रदर्शनाचे उदघाटन आज पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्यातील शेतकरी आणि पशु पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे पशुप्रदर्शन महाशिवरात्रीच्या औचित्याने प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीत होते असल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत असल्याचे पंकजा म्हणाल्या.

या पशुप्रदर्शनाच्या उदघाटनापूर्वी सहभागी झालेल्या विविध प्रजातीच्या पशुधनाची त्यांनी पाहणी केली. तसेच शेतकरी आणि पशुपालकाशी संवाद साधला. आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत मिनी कारमधून त्यांनी महाएक्सपोचा फेरफटकाही मारला. तरुणांनी पशुधनावरआधारित व्यवसायाला उद्योगाची जोड द्यावी. नोकरी करणाऱ्या पेक्षा नोकरी देणारे व्हावे. पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी असलेल्या अनेक योजना आहेत, ज्याचा लाभ शेतकरी, तरुणांनी घेतला पाहिजे, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

उद्या मुख्यमंत्री येणार..

प्रदर्शानातील विविध जातीच्या पशुंसोबत फोटो काढा, मी काय किंवा धनंजय काय? आम्ही इथलेच आहोत. तुम्हाला नेहमी उपलब्ध आहोत. आमच्याबरोबर कधीही फोटो काढता येतील, हे प्रदर्शन आणि इथे असलेल्या सर्व गोष्टी या तुमच्या फायद्याच्या आणि भविष्यात काय करायचे आहे? हे ठरवण्यासाठीच्या आहेत, त्याचा लाभ घ्या, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तेव्हा त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शिस्तीत या, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पशुपालकांना आधुनिक व्यवसायाच्या माहितीसह नवीन तंत्रज्ञानाशी परिचित होण्याची संधी या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच या प्रदर्शनात विविध जातीचे पशू, त्यांची इंत्यभूत माहिती आणि व्यवसायासाठी होणारे फायदे याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

सोबतच याठिकाणी पशुव्यवसाय, कृषी आणि बचत गटांच्या संदर्भात माहिती देणारे तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स याठिकाणी उभारण्यात आले आहेत. यामाध्यमातून शेतकरी, पशू पालकांना आधुनिकतेची जोड मिळणार आहे. माझी सर्व शेतकरी, पशूपालक आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी या पशू प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT