Beed : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे दोघे दोन दिवसांपुर्वी भगवान गडावर एकत्र आले. तिथे या दोघांनी केलेले भाषण आणि कडवटपणा नाहीसा करण्याचा केलेला संकल्प यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. त्यानंतर आज गहिनीनाथ गडावर देखील या दोघा बहिण-भावांनी हजेरी लावली.
भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड हे देखील माझे श्रध्दास्थान आहे. गडाची वारी दरवर्षी मी न चुकता करते, अशा शब्दात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Beed) संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या परंपरेतील ९१ व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता आज मानूर ता.शिरूर कासार येथे भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठया थाटात आणि भक्तीमय उत्साहात झाली.
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प.विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन यावेळी पार पडले. भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड हे देखील माझे श्रध्दास्थान आहे. (Bjp) गडाची वारी दरवर्षी मी न चुकता करते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासा करिता २५ कोटीचा निधी दिला होता, त्या माध्यमातून अनेक विकासाची कामं याठिकाणी झाली, याची आठवण देखील पंकजा मुंडे यांनी करुन दिली.
गडाची एक भक्त म्हणून तुमच्या प्रेम आणि विश्वासावर पुढेही अशीच सेवा करत राहील, असा शब्द देखील पंकजा यांनी यावेळी उपस्थितांना दिला. भगवान गडावर पंकजा व धनंजय मुंडे यांनी केलेले भाषण आणि एकमेकांबद्दल व्यक्त केलेले प्रेम याची चर्चा सुरू असतांनाच आज गहिणीनाथ गडावर देखील या दोघांच्या उपस्थितीने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.