Pankaja Munde News : Dhananjay Munde
Pankaja Munde News : Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजांनी साधला आपल्याच बंधूंवर निशाणा ; म्हणाल्या, 'कॉपी करून मुंडे साहेब...'

सरकारनामा ब्यूरो

Beed News : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) २०२४ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता सक्रियपणे मैदानात उतरल्याचे दिसत आहे. आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आपले बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मुंडे साहेबांसारखं करणं, मुंड साहेबांची कॉपी करणं, असं करून कोणालाही मुंडे साहेब होता येत नाही, त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे, विचारांप्रमाणे वागणे म्हणजे मुंडे साहेब होणे आहे," असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

पराभवाचं दुखं लोकांनी व्यक्त केले, हे अनुभवायला मिळालं :

पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड येथे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पराभव झाल्याचा जास्त फायदाच झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "पराभवामुळे वेळ मिळाला, त्या वेळेतून मला जे काही शिकायला मिळाले, मला जे अनुभवायला मिळाले ते अभूतपूर्व आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या पराभवाचं दुःखं माझ्या मतदारसंघातील लोकांसह राज्यातील लोकांना झाले, हे अनुभवायला मिळाले, हे माझे मोठे भाग्य आहे."

मुंडे पुढे म्हणाल्या, "मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात काम करताना देशातील अत्यंत प्रगत मध्यप्रदेशात काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. चार वेळा मुख्यमंत्री राहूनही शिवराज चौहानसारखे साधे, सरळ, मेहनती मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला पराभवामुळे मिळाली. सचिव म्हणून बैठक घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अनुभवायला मिळत आहे"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT