Pankaja Munde|Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Video Pankaja Munde : जरांगे-पाटलांचं 'ते' विधान अन् पंकजा मुंडे म्हणाल्या, फक्त बोलून उपयोग नाही, ते...

Akshay Sabale

Maharashtra Political News : मराठा आणि ओबीसी आरक्षणाची धग अजूनही धगधगत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यास आणि सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यास विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

त्यासह 288 पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय जरांगे-पाटील 29 ऑगस्टला घेणार आहेत. यावर आमदार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "फक्त बोलून उपयोग नाही, करून दाखवलं पाहिजे," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्याशी संवाद साधत होत्या.

288 पाडायचे की निवडून आणायचे, असं जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) 29 ऑगस्टला ठरविणार आहेत. आंदोलनाचं राजकीय स्वरूपात रूपांतर झालं आहे, याकडे कसे बघता? असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी याकडे काहीही बघत नाही. जोपर्यंत कुणीही व्यक्ती जे बोलतात करून दाखवत नाहीत, तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही. नुसते बोलून उपयोग नाही. ते करून दाखवलं पाहिजे."

"मी पण एखादी मोठी घोषणा करेल, दंड थोपटून बोलेल, मात्र ते प्रत्यक्षात करायला हवं. त्यामुळे कुणीही बोललं, तर प्रत्यक्षात काय करतात, याकडे माझे उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी जास्त बोलणार नाही," असं पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) सांगितलं.

पंकजा मुंडेंनी जातीवाद थांबवावा, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं आहे. यावर पंकजा मुंडेंनी म्हटलं, "जरांगे-पाटलांनी माझ्यावर विश्वास दाखविल्यानं त्यांचे आभार मानते."

प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी यात्रेवर पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी याकडे सकारात्मक दृष्टीनं बघते. प्रकाश आंबेडकर यांना आणि लक्ष्मण हाके यांना शुभेच्छा आहेत. शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कुणी कार्यक्रम घेत असेल आणि त्यात लोक जोडली जात असतील, तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT