Pankaja Munde : बीड : पक्षातील नेते घुमून फिरून मला परळी को संभालो, असे म्हणतात.. झाली एकदा चूक ती किती महागात पडली..मी कमी पडली असेल. मात्र, त्याची जाणीव करून दिली जात आहे, अशी खंत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडे बीडमध्ये (Beed) बोलत होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. परळीची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. हा पराभव पंकजा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र, पक्षातील नेते प्रत्येक वेळी परळी संभाळा असा सल्ला देत असल्याचे सांगत पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना संपूर्ण आयुष्यात साडेचार वर्ष सत्ता मिळाली. म्हणून थांबले का साहेब, कोणासमोर झुकले का साहेब, त्याच प्रमाणे मी थकणार नाही, रुकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यावरुन मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंडे साहेबांच्याही वाट्याला पराभव आला होता. तो पराभव माझ्या देखील वाट्याला आला. त्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जोपर्यंत मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझा बाल हि बाका होणार नाही. तिरंगी लढत झाली असती तर सीट लागली असती, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.