Chandrakant Kahiare On Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire On Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावे, उद्धव ठाकरे त्यांना बहिण मानतात..

Maharashtra : अर्थात उद्धव ठाकरे यांची तयारी असेल तर हे शक्य आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ३२ आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Chandrakant Khaire On Pankaja Munde ) यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरायचे होते, आत्या त्यांच्या हातात हात घालून फिरण्याची वेळ आली. यामुळे भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार? अशा चर्चा सुरू असतांनाच आता पंकजा मुंडे काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी कुजबूज सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी माध्यमांशी बोलातंना पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. पंकजा मुंडे यांनी जायचेच असेल तर इतर कुठल्या पक्षात न जाता शिवसेनेत यावे, हे त्यांचे घर आहे. शिवाय उद्धव ठाकरे त्यांना बहिण मानतात, असे म्हणत साद घातली आहे.

अर्थात उद्धव ठाकरे यांची तयारी असेल तर हे शक्य आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. (Shivsena) पंकजा मुंडे गेल्या काही वर्षापासून पक्षाकडून डावलले जात असल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा आहे. भाजप आणि स्वतः पंकजा यांनी वेळोवेळी याचा इन्कार केला असला तरी कृतीतून दोन्ही बाजूंनी ते दिसून आले आहे. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आणि धनंजय मुंडे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे आता पंकजा मुंडेंचे काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात असतांना त्यांच्या काॅंग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अर्थात काॅंग्रेस आणि पंकजा यांच्याकडून याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र या संदर्भात खैरे यांना विचारले असता, ते म्हणाले पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेना-भाजप युती २५ वर्ष टिकली त्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे भाजपकडून अन्याय होत असल्याच्या भावनेतून त्या पक्ष सोडणार असतील तर त्यांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकरावा, असे माझे मत आहे. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्यामुळे त्यांना घरासारखा आहे.

शिवाय उद्धव ठाकरे पंकजा यांना आपली बहिण म्हणतात. काॅंग्रेसमध्ये त्या कधीही जाणार नाहीत, तसा विचार देखील करणार नाही, असा विश्वास देखील खैरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्ष पद काही महिन्यातच जणार आहे. चार राज्याचे प्रदेशाध्यक्ष बदलेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला देखील खैरेंनी लगावला. राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सहभागी होण्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेना फोडण्याचा तळतळाट त्यांना आणि भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT