Pankaja Munde News, Aurangabad  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : महापुरुषांच्या अवमानाचा निषेध म्हणून पंकजा मुंडे मौन पाळणार..

Marathwada : भाजपच्याच नेत्यांकडून महापुरूषांचा वारंवार अवमान केला जात आहे

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : राज्यात महापुरुषांबद्दल केल्या जाणाऱ्या अवमानकारक विधानांचा निषेध आणि देशातील अप्रिय घटनांच्या निषेधार्थ उद्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी Bjp भाजपनेत्या पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर अर्ध्या तासाचे मौन बाळगणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांची उद्या जयंती असल्यामुळे गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. (Marathwada) गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात भजन, कीर्तनासह अर्ध्या तासाचे मौन पाळण्यात येणार आहे.

हे मौन देशातील अन्याय, अत्याचाराच्या घटना आणि महापुरुषांच्या होणाऱ्या अवमानात बद्दल असणार आहे. सध्या राज्यात भाजप नेत्यांकडून महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामुळे ठीकठिकाणी आंदोलने आणि निदर्शने देखील सुरू आहेत.

नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जुन्या काळातील संदर्भ देताना महात्मा ज्योतिबा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चुकीचे विधान केले. यावरून राज्यात विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना व पक्ष रस्त्यावर उतरले आहेत.

पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई देखील फेकण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी गडावर मौन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे भाजपच्याच नेत्यांकडून महापुरूषांचा वारंवार अवमान केला जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या नेत्या या विरोधात मौन पाळत असल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT