Pankaja Munde News : 
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजा मुंडे म्हणतात मी नाराज नाही, मग भाषणातील टोलेबाजीचा रोख कुणाकडे?

'मला नाही तर तुलाही नाही, असं माझं नसतं. मला नाही पण तुझं तू पदरात पाडून घे'

सरकारनामा ब्युरो

Pankaja Munde News : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं जाहीरपणे सांगितलही आहे. पण दुसरीकडे त्यांची वक्तव्ये मात्र त्या नाराजीची प्रचिती देत आहेत. मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेत बोलतांना त्यांनी पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पण त्याचवेळी त्यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजीही केली.

''मी कधीही कुणाला त्रास देत नाही. पण जर मी कोणाला त्रास द्यायचं ठरवलचं, तर तुम्हाला दररोज दोन-चार हजार लोक भेटायला येतील. याचा त्यांना पुढील दोन महिने त्रास होईल, पण मी त्यांना बांधून ठेवलयं, मी त्यांना नजरेने बांधले आहे. आपण काही मागायचं नाही आणि काही म्हणायचं नाही ', असे म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना चिमटा काढला आहे.

“मला नाही तर तुलाही नाही, असं माझं नसतं. मला नाही पण तुझं तू पदरात पाडून घे. आपण कायम राजाच आहे. राजाला कितीही फाटकी वस्त्र घातली तरी ते लपत नाही. त्याला सिंहासनावरुन प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवलं तरी त्याचं तेज लपत नसतं. समोरुन बोलणं हे आपले संस्कार, आपण मागून वार करणारे लोक नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या ताटात जाऊन दोन घास खायची इच्छा नाही.” असा टोलाही त्यांनी लगावला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ' जसे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नेते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते. तसेच माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत. आज 'नरेंद्र मोदी तर जगात विक्रम करत आहेत, सगळ्यात जास्त सदस्य असलेल्या भाजप पक्षाचे नरेंद्र मोदी हे नेते आहेत. जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता नरेंद्र मोदी आहेत', अशा शब्दातं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. पण दुसरीकडे राज्यातील पक्षश्रेष्ठींना आपले नेते मानायला तयार नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ' अमित शहा हे जगात सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे नेते आहेत. आम्ही हे सगळं बघत आहोत त्यात आम्ही कुठे दिसतोय का ? हे पाहत आहोत. राजकारणात सगळ्यांना नमस्कार घालावा लागतो. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना त्रास द्यायला जाऊ नका, अशाही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT