Aurangabad Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात झाली आहे. (Pankaja Munde News) नुकतेच त्यांनी माहूरगड येथे रेणुकादेवीचे दर्शन घेत आपल्या परिक्रमेला सुरूवात केली होती. आज श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन पंकजा यांनी घेतले. बारावे ज्योतिर्लिंग श्री.घृष्णेश्वराची विधिवत पुजा,अभिषेकही त्यांनी केला.
चार ते ११ सप्टेंबर दरम्यान दहा जिल्ह्यातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवशक्ती परिक्रमा याञा करण्याचे जाहीर केले आहे. (BJP) दरम्यान महाराष्ट्रातील त्यांच्या मतदारसंघातील परळी वैजनाथसह, औंढा नागनाथ, ञ्यंबकेश्वर ,भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांचेही दर्शन पंकजा मुंडे घेणार आहेत.
शिवशक्ती परिक्रमा याञेची सुरुवात वेरुळ येथून करण्यात आली आहे. (Marathwada) योगायोगाने प.पु.भगवान बाबा यांची देखील आज जयंती असुन,या परिक्रमा याञेस सुरुवात केली. जनआशीर्वाद, जनसंपर्क हाच यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे पंकजा यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या आठवणींना पंकजा यांनी उजाळा दिला. बाबा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असतांना परळी वैजनाथ ते घृष्णेश्वर अशी शेतकरी संघर्ष याञा काढली होती. या यात्रेचा समारोप घृष्णेश्वर चरणी करण्यात आल्यानंतर वेरुळ गांवात सभा घेण्यात आल्याचे पंकजा यांनी यावेळी सांगितले.
पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करत आहेत.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.