Tanaji Sawant News Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant: तानाजी सावंतांच्या रॅलीमध्ये शिवसैनिक घुसले ; उद्धव ठाकरेंचे बॅनर दाखवले; VIDEO पाहा

Paranda Assembly Election: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Mangesh Mahale

Eknath Shinde Shiv Sena: शिवसेनेचे नेते, उमेदवार तानाजी सावंत यांनी आज भूम येथे शक्ती प्रदर्शन करीत शहरात रॅली काढली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार रणजित पाटील (Ranjit Patil) यांचीही रॅली याचवेळी भूम शहरात होती.

यावेळी सावंतांचे कार्यकर्ते आणि ठाकरेंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. तानाजी सावंत यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे बॅनर दाखवण्यात आले.

तानाजी सावंत यांच्या रॅलीत घुसून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे बॅनर दाखवल्याने सावंत यांचे कार्यकर्ते संतापले होते. यावेळी स्पीकरवरुन 'गद्दारांना बॅनर दाखवू नका,' असे सांगण्यात आले. त्यामुळे भूम शहरातील मध्य रस्त्यावर काही काळ तणाव वाढला, दोन्ही पक्षातील शिवसैनिकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात ते मैदानात उतरवले आहेत.

परांडा विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी सावंत हे शिवसेना फूटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती. सावंत विजयी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून राहुल मोटे हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सुटला आहे. त्यामुळे तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोटेंचा पत्ता यावेळेस कट झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT