Parbhani Riot News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Violence : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; आंबेडकरांकडून 'तो' फोटो व्हायरल

Parbhani Custody Somnath Suryawanshi Death Maharashtra Band: सूर्यवंशी यांच्या वैद्यकीय अहवालाचा फोटो वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टि्वट केला आहे. त्याचा म़त्यू मारहाणीमुळे झाल्या असल्याचे आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Mangesh Mahale

संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याचे राजकारण पेटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं. विविध आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

अशातच या प्रकरणात मोठी अपडेट येत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले. यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांना 11 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत होता. त्यांचा कोठडीत मृत्यू झाल्याची वृत्त समजात परभणीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ आज परभणी बंद पाळण्यात येत आहे.

सूर्यवंशी यांच्या वैद्यकीय अहवालाचा फोटो वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टि्वट केला आहे. त्यांचा म़त्यू मारहाणीमुळे झाल्या असल्याचे आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल (रविवारी) सकाळी सोमनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 10 डिसेंबरला एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, त्याविरोधात 11 तारखेला आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दगडफेक केल्याचा आरोप सोमनाथ यांच्यावर होता. आज आंबेडकरी अनुयायांकडून परभणी शहर बंद ठेवण्यात आले.

सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी देखील अंधारेंनी केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT