Parbhani District  
मराठवाडा

Parbhani Bank : परभणी जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर! एकाच पक्षात असलेल्या वरपूडकर-बोर्डीकरांचं काय होणार? नवी गणितं कशी असतील?

Parbhani District Bank Election: परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्यात आणखी एका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

Jagdish Pansare

Parbhani District Bank Election : परभणी-हिंगोली विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्यात आणखी एका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आमदार, खासदारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा बँकांच्या संचालक मंडळ निवडणुकीचा बार यंदा उडाला आहे. नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे.

संभाजीनगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी चार जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर आता परभणी जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. 21 संचालकपदासाठी 17 ते 23 जून दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 20 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कायम जिल्हा बँकेवर वर्चस्व राहिले आहे.

मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे आता हे दोन्हीही बडे नेते एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हे दोघे एकत्र लढतात की मग स्वतंत्र पॅनल उभे करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या असल्याने त्याही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आवर्जून लक्ष घालतील हे वेगळे सांगायला नको. आता जिल्हा बँकेसाठी वरपूडकर- बोर्डीकर हे जुळवून घेतात की मग स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत वेगळी राजकीय खेळी करतात? यावर जिल्ह्यातील पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

नव्या सहकार कायद्यामुळं गणित बदलली

नव्या सहकार कायद्यामुळे दहा वर्षांमध्ये कार्यकाळ संचालक असलेल्या नेत्यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे अशा नेत्यांकडून आपल्या मुला-मुली किंवा नात्यागोत्यातील इतरांना जिल्हा बँकेच्या राजकारणात आणले जाऊ शकते. या निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदार संघातून 14, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था एक, इतर शेती संस्था एक, महिला राखीव दोन, अनुसूचित जाती अथवा जमाती एक, इतर मागासवर्ग एक, विमुक्त जाती व भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्ग एक अशा एकूण 21 संचालकांची निवड केली जाणार आहे.

17 ते 23 जून दरम्यान अर्जाची मुदत

24 जून रोजी अर्जांची छाननी होऊन 25 रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 25 ते नऊ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी चिन्ह वाटप केले जाणार असून 19 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT