Parbhani district Bank election results; Suresh Warpudkar and Meghana Bordikar  sarkarnama
मराठवाडा

Parbhani district Bank : परभणी जिल्हा बँकेवर वरपूडकर बोर्डीकर गटाचे वर्चस्व कायम; महायुतीचा 21 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय!

Parbhani district Bank election news: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीचा 21 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

परभणी : प्रसाद जोशी

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वरपूडकर–बोर्डीकर गटाने स्पष्ट वर्चस्व राखत 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. यापैकी 13 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 8 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली.

मतमोजणीनंतर आमदार सईद खान, आमदार चंद्रकांत नवघरे, राजमती मुटकुळे, आकाश चोखट, नंदकुमार डाखोरे, अभय सावंत, शोभा बोबडे आणि दत्तात्रय मायंदळे हे विजयी घोषित झाले. प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाखोरे यांनी तुळशीराम बोबडे यांचा 34 विरुद्ध 28 मतांनी पराभव केला. मानवत मतदारसंघातून बँकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांचे सुपुत्र आकाश चोखट यांनी अमोल कदम यांचा 20 विरुद्ध 15 मतांनी पराभव केला.

हिंगोली मतदारसंघात राजमती मुटकुळे यांनी 59 मते मिळवत रमेश शिंदे (31) व गुलाबराव सरकटे (0) यांचा पराभव केला. वसमत मतदारसंघातून आमदार चंद्रकांत नवघरे यांनी तुषार जाधव यांच्यावर 58 विरुद्ध 20 मतांनी विजय मिळविला. कळमनुरी मतदारसंघात अभय सावंत यांनी 35 मते मिळवत दत्तराव कदम (12) व बाळासाहेब मगर (3) यांचा पराभव केला.

इतर शेती संस्था गटात सर्वाधिक लक्षवेधी लढत आमदार सईद खान आणि विजय जामकर यांच्यात झाली. या अटीतटीच्या लढतीत सईद खान यांनी 290 विरुद्ध 287 अशा केवळ तीन मतांच्या फरकाने विजय संपादन केला. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शोभा बोबडे यांनी 1,216 मते मिळवत प्रशास ठाकूर (12), अतुल सरोदे (176) आणि संजय सारणीकर (3) यांच्यासह इतर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून विद्यमान संचालक दत्तात्रय मायंदळे यांनी तब्बल 1,066 मते मिळवत स्वराजसिंह परिहार (348), सुनंदा फुलके (9), बळीराम सोरेकर (3) आणि अभय कुंडगीर (5) यांचा पराभव केला. या निकालामुळे जिल्हा बँकेवर वरपूडकर–बोर्डीकर गटाचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले असून, बँकेच्या आगामी कारभारावर या गटाचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT