Sunil Tatkare  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabh News : लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सुनील तटकरेंचा परभणी दौरा

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

Prasad Shivaji Joshi

Parbhani Lok sabh News : लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी अंतिम टप्पात आली असल्यामुळे राजकीय नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून संघटनात्मक कामाचा आढावा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी परभणीचा विशेष दौरा करत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला.

महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाला मिळालेल्या मतामुळे परभणीच्या जागेसाठी पक्ष आग्रही आहे. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजेश विटेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यामुळे राजेश विटेकर यांच्या उमेदवारीसाठी अजित पवार हे स्वतः आग्रही आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे कृषिमंत्री व पक्षाचे प्रचारप्रमुख धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावाही झाला. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा खास दौरा करून संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. या सर्व घडामोडींमुळे परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशात भाजपचे सरकार स्थापन होऊन पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बसावेत, यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. पक्षाने बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. तसेच विविध अभियानाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्ते व नेते केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क करत आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. एकूणच पक्षाची आक्रमक प्रचार यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या सर्व परिस्थितीचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीही अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही अजित पवार यांच्या निर्णयाला समर्थन दिले. तसेच विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जातात.

जिंतूर मतदारसंघ भाजपकडेच आहे. परभणीचे माजी महापौर प्रतापभैया देशमुख हेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला अनुकूल वातावरण दिसून येत आहे. या राजकीय परिस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणीच्या जागेसाठी आग्रही मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा परभणीसाठीचा विशेष दौरा यासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT