Parbhani Market Committee, News  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Market Committee : राष्ट्रवादीचे घुमजाव, आधी म्हणाले भाजपला पाठिंबा नाही, आता स्थानिक नेत्यांना अधिकार..

Marathwada : दुर्राणी यांनी या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा पत्र काढून तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांना सर्वाधिकार दिल्याचे घोषित केले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती (Parbhnai Market Committee) निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल बनवतांना राष्ट्रवादीला विचारात घेतले नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काल पत्रकार परिषद घेवून केला होता. तरी देखील आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही, आघाडीचेच काम करू असेही स्पष्ट केले होते. परंतु २४ तासांत त्यांनी आपल्या या निर्णयावरून घुमजाव केले आहे.

बाजार समिती निवडणुकीचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ते जे ठरवतील तसेच होईल, असे सांगत त्यांनी आज वेगळीच भूमिका घेतली. (Babajani Durrani) त्यामुळे महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या राष्ट्रवादीने बाजार समितीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसते. (Ncp) दोन स्थानिक नेत्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या पत्रामुळे पेच निर्माण झाला होता.

अखेर जिल्हाध्यक्ष दुर्राणी यांनी या संदर्भात शनिवारी रात्री उशिरा पत्र काढून तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांना निवडणुकी संदर्भातील सर्वाधिकार दिल्याचे घोषित केले. परंतु, या प्रकारामुळे राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार (Parbhani) परभणी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आला असल्यामुळे तेथील सर्व निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील, असे दुर्राणी यांनी स्पष्ट केले.

तसेच राष्ट्रवादीचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी काढलेल्या प्रेस नोटशी माझा काहीही संबंध नाही. या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रवादी परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांना देण्यात आला आहे, असे नमूद केले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भातील प्रक्रियेत सुरुवातीपासून चर्चा करण्याचा जागांच्या वाटाघाटी करण्याचा तसेच इतर पक्षासोबत आघाडी करण्याच्या कामात परभणी तालुकाध्यक्ष देशमुख व त्यांचे सहकारी सक्रिय सहभागी आहेत.

त्यामुळे तेथील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला जिल्हास्तरावरील नेतृत्वाचे समर्थन असल्याचे आमदार दुर्राणी यांच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून शनिवारी दुपारी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी पत्र काढून भाजपला पाठिंबा नाहीच, असे दुर्राणी यांनी सांगितल्याचे म्हटले होते. परंतु, काही तासांतच दुर्राणी यांच्या लेटरपॅडवर स्वतः बाबाजानी यांनी प्रा. किरण सोनटक्के यांचे पत्र ग्राह्य धरू नये असे सांगून स्थानिक नेतृत्वाचा निर्णय अंतिम आहे, असे स्पष्ट केले. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बाजार समिती निवडणुकीवरून मतभेद असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT