Parbhani Ncp political News
Parbhani Ncp political News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Ncp News : पवारसाहेब निर्णयावर ठाम असतील, तर माझाही राजीनामा...

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा मंगळवारी (ता.दोन) केली. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली. (Parbhani Ncp political News) राजीनामा सत्रांचे सुरू असलेले लोण आता मराठवाड्यातही पोहचले आहे. कालपासून मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी दबाव वाढवला.

यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांची देखील भर पडली आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अॅड. गव्हाणे यांनी या संदर्भात गुरुवारी प्रसिध्दी माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, शरद पवार (Sharad Pawar) यांना मी पत्र लिहिले आहे.

या पत्रात म्हटंले आहे की, सगळीकडे जातीय व धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. अशावेळी महाराष्ट्राला आपल्या सारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. (Parbhani) आपला निर्णय हा पक्ष कार्यकर्त्यासाठीच नव्हे तर पुरोगामी माणसांसाठी धक्कादायक आहे. राज्यातील तमाम तरूणाई आपणाकडे एक उर्जास्त्रोत म्हणून पाहते.

देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले असतांना आपण आज देशासमोर एक खंबीर असा पर्याय म्हणून उभे आहात. देशातल्या सर्व धर्मनिरपेक्ष नेत्यांना एकत्र आणण्यात आपली भूमिका महत्वाची आहे. सध्या राज्यातील जातीयवादी विचारांचे सरकार घालविण्यासाठी येणारी विधानसभा निवडणुक महत्वाची आहे. अशा परिस्थिती आपली सर्वांना गरज आहे. आपण निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, ही विनंती.

वाढत्या वयाचा तगादा म्हणून थांबावे लागते हे मलाही मान्य आहे. परंतू ही वेळ आता थांबण्याची नाही. आपण जो निर्णय घेतला आहे, तो आणखी दोन वर्षांनी घ्यावा. आपण जर निवृत्तीच्या या निर्णयावर ठाम राहणार असाल तर मी राष्ट्ववादी कॉग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द करित असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. आपण आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवीला असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT