Parbhani Ncp News  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Ncp News : परभणीत शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला पुन्हा दणका..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिंदेसेनेमध्ये इनकमिंग सुरूच आहे, काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना गळाला लावल्यानंतर आता पुन्हा मोठे प्रवेश होतांना दिसत आहेत. (Parbhani Ncp News) परभणी जिल्ह्यातील शिंदेसेनेचे युवा नते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करत आहेत.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाने शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. (Parbhani) मुंबई, पुण्यातील हे लोण मराठवाड्यात देखील पोहचले आहे. काही महिन्यांपुर्वी परभणी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अनेक स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले होते.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा परभणीत (Ncp) राष्ट्रवादीला पुन्हा धक्का बसला आहे. (Shivsena) जिल्ह्यातील माजी आमदारांबरोबर १२ पेक्षा अधिक माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक बडे पदाधिकारी आज मुंबईत शिवसेनेत दाखल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी बरोबर ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केले आहेत. आज देखील अनेक बडे चहेरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत , यात सर्वाधिक चेहेरे हे राष्ट्रवादीचे असणार आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागा पैकी पहिल्यांदा शिवसेनेचे नेते सईद उर्फ गब्बरखान यांच्या नेतृत्वात सहा जागा जिंकत त्यांनी बाबाजानी यांना आव्हान दिले होते. त्यामुळे जिल्हात शिवसेना शिंदे गटाची ताकत वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT