Attack On Police In Parbhani Dsitrict
Attack On Police In Parbhani Dsitrict Sarkarnama
मराठवाडा

Parbhani : यात्रेतील अवैध धंदे रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन् मारहाण...

सरकारनामा ब्युरो

परभणी : सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथे सुरू असलेल्या यात्रेतील अवैध धंदे बंद करण्याच्या कारणावरून अवैध धंदे चालक गावकरी आणि पोलिसांत वाद निर्माण झाला. (Parbhani) या वादातून पोलिसांवर दगडफेक करून त्यांना बेदम मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Police) या हल्यात पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना ( ता.3) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. (Marathwada)

या घटनेमुळे संतापलेल्या पोलिसांनी गावातील वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतले आहे. लाडनांद्रा येथे भैरवनाथाची यात्रा भरली असून यात्रा काळात बंदोबस्तासाठी पाथरी पोलीसांना पाचारण करण्यात आले होते. यात्रेत अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई सुरु केली होती. रात्री दहाच्या सुमारास यावरून वाद निर्माण झाला.

अवैध धंदे करणारे गावातील काही जणांचा यावरून पोलिसांशी वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन विकोपाला गेला आणि काहींनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली. पोलिसांची संख्या कमी असल्याने दगडफेक करणारा जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांना चक्क बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

या हल्यात पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस जखमी झाले. पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या हाताला जबर मारहाण झाल्याने त्यांना व एका कर्मचाऱ्याला उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी आता हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी गावातील दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT