Beed Mahavitaran crime News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : खासगी लोकांची वीज बीलं परळी नगरपरिषदेच्या नावावर, दोन अभियंते निलंबित!

In the Parli Municipal Council electricity bill scam, two engineers have been suspended as part of the ongoing investigation into financial irregularities. : परळी नगरपरिषदेतील वीज बील घोटाळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. खासगी वीज ग्राहकांची बीलं चक्क नगरपरिषदेच्या नावावर दाखवून घोटाळा झाल्याने खळबळ.

Jagdish Pansare

Marathwada News : बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेतील वीज बील घोटाळा नुकताच उघडकीस आला होता. शहरातील खासगी वीज ग्राहकांची बीलं चक्क परळी नगरपरिषदेच्या नावावर दाखवून तब्बल 39 लाखांचा घोळ केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर महावितरणने दोन अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करत झटका दिला.

गेल्या काही दिवसापासून परळी (Parli) नगरपरिषदेतील वीज बील घोटाळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. खासगी वीज ग्राहकांची बीलं चक्क नगरपरिषदेच्या नावावर दाखवून मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात ओरड आणि तक्रार झाल्यानंतर अखेर महावितरण कंपनीने दोन अभियंत्याना निलंबित करत शाॅक दिला आहे. परळीमध्ये खासगी ग्राहकांच्या घरची बिले नगरपरिषदेच्या नावावर टाकून त्याद्वारे रक्कम जमा करत 39 लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटे यांनी महावितरणकडे केली होती.

त्यानंतर, आता महावितरणने (Mahavitaran) या तक्रारीची दखल घेत विभागातील रत्नदीप कटके व प्रशांत आंबडकर या दोन अभियंत्यांना निलंबित केले आहे. आंबडकर आणि कटके यांच्या आयडीवरुन पोर्टलवर सदरील सर्व प्रकार करण्यात आल्याचे निलबंन पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का? याची चौकशी केली जात असून जे अधिकारी कर्मचारी या प्रकारात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे बीड येथील अधीक्षक अभियंता राजपूत यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणात खासगी ग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम थेट नगरपरिषदेच्या नावावर टाकण्यात आली. यामध्ये महावितरण आणि नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात लाखो रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटे यांनी केली.काही खासगी ग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम त्यांच्याच नावे न भरता नगरपरिषदेच्या खात्यात भरली गेली.

याबाबतची लेखी तक्रार प्राप्त होताच महावितरण विभागाने तातडीने हालचाली करत विभागीय स्तरावर चौकशी समिती नियुक्त केली. तब्बल 21 खासगी ग्राहकांचे बील थेट चीफ ऑफीसर नगर परिषद यांच्या नावे टाकण्यात आली. या ग्राहकांकडे जास्तीत जास्त 1 लाख 28 हजार ते कमीत कमी 6300 पर्यंतचे बील आहे. या सर्व लोकांकडून 50 टक्के, 40 टक्के पैसे घेऊन सर्व 21 लोकांचे बील हे चीफ ऑफीसर नगर परिषद नगरपालिका गार्डन, चीफ ऑफीसर नगरपरिषद वॉटरवर्क, चीफ ऑफीसर म्युनिसिपल काऊन्सिल या नावाने टाकून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT