Bjp Leader Pankaja Munde Beed Sarkarnama
मराठवाडा

`पवारसाहेब, तुमच्या पक्षाची दहशत, प्रतिमा एकदा बीडमध्ये येऊन बघाच!`

पंकजा मुंडे यांनी (Bjp Leader Pankaja Munde) मी दोष जयंत पाटलांना, पवार साहेबांनाही देणार नाही. मात्र माझी एवढीच विनंती आहे, की एकदा येऊन बीड जिल्ह्यामध्ये बघा, असे आवाहन केले.

सरकारनामा ब्यूरो

बीड ः जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची जनसामान्यांमध्ये काय प्रतिमा आहे, लोकांच्या मनात तुमच्या पक्षाची किती दहशत आहे हे एकदा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवारांनी येऊन पहावे, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर इथले एक आमदार दुसऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. एकमेकांच्या रेषा ओलांडत नाहीत, कशी एकरूपता येईल, मग परिवार संवाद यात्रेचा उपयोग काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी बीडमध्ये भाजपच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. जिल्ह्यात तुमच्या पक्षाची प्रतिमा काय आहे, लोकांमध्ये किती दहशत आहे हे एकदा येऊन बघा, असे आवाहन करतांनाच राष्ट्रवादीतील अंतर्गत लाथाळ्यांवरही त्यांनी टीका केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्ह्याचा पालक म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा विकास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, असा विचार असला पाहिजे. राष्ट्रवादीत तर कुणाचा कुणाला मेळ नाही. बीड जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर इथले एक आमदार दुसऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. एकमेकांच्या रेषा ओलांडत नाहीत, मग कशी एकरूपता येईल? मग परिवार संवाद यात्रेचा उपयोग काय? मी दोष वरच्यांना देणार नाही, मी दोष जयंत पाटलांना, पवार साहेबांनाही देणार नाही.

मात्र माझी एवढीच विनंती आहे, की एकदा येऊन बीड जिल्ह्यामध्ये बघा, तुमच्या पक्षाची काय प्रतिमा आहे. लोकांच्या मनामध्ये काय दहशत आहे. लोकांच्या मनामध्ये कशाप्रकारे यांच्याविषयी भावना आहे. हे बघण्याची खरचं गरज आहे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारं सुद्धा चुकीचा असतो, चांगल्या माणसाच्या पाठीशी तुम्ही उभे नाही राहिलातं तर मग तुमचा काही उपयोग नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आम्ही तुम्हाला वर्ष-दीड वर्ष काम करण्याची संधी दिली, पण आता आम्ही ठरवलंय आता नाही, असा इशाराही पंकजा यांनी यावेळी दिला. बीड जिल्ह्यातील विकासासाठी इथले पालकमंत्री निधी देत नाहीत, आज जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समिती सर्कल असेल, या ठिकाणी प्रचंड विकास कामे रखडली आहेत.

पालकमंत्र्यांच्या देखील जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना निधी मिळत नाही. त्यामुळे या बीड जिल्ह्याचा विकास प्रचंड रखडला आहे, अशी टीका देखील पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री मुंडे यांच्यावर केली. जोपर्यंत लोकं म्हणतील, लोकं सावरगावघाट येथे येतील, तोपर्यंत त्या ठिकाणी मेळावा होणारचं, मी त्या ठिकाणी दर्शनाला जाणारचं, असे देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT