Vinayak Mete-Sharad Pawar
Vinayak Mete-Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

पवारांनी चांगला मुहूर्त पाहिला नव्हता, म्हणूनच राज्यात पालथ्या पायाचे,अपशकुनी सरकार

Dattatrya Deshmukh

बीड : राज्यात शरद पवारांच्या कृपेने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. पण, सरकार बनवतांना पवारांनी चांगला मुहूर्त बघितला नव्हता, चांगल्या पंडितांना विचारलं नव्हतं. म्हणूनच राज्यात पालथ्या पायाचे आणि अपशकुनी सरकार आले. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून राज्यावर विविध संकटे येत असल्याचा हल्लाबोल शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीबाबत मेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेटे म्हणाले, येणाऱ्या वर्षात अपशकुनी सरकार जाऊन चांगल्या विचाराचे सरकार यावे, अशी आई भवानीला प्रार्थना असून सामान्यांचीही हीच इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्तीची घोषणा केली पण कर्जमाफीही निट दिली नाही.

२५ हजार रुपये मदतीची घोषणाही पाळली नाही. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे तीनही पक्षांचे नेते शेतकऱ्यांसोबतच लबाडी आणि विश्वासघात करतात. विश्वासघात हा सरकाचा स्थाईभाव आहे. दोन वर्षांत सरकारने व्यापारी, शेतकरी, शेतमजूर या घटकांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याऐवजी आता उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या माध्यमातून वीज देयकाच्या नावाखाली शेतीपंपांच्या वीज जोडण्या तोडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त सभागृहात घोषणा करतात. जानता राजा शरद पवारांना दोन वर्षांत नेकमे काय कळाले, असा सवाल करत राज्यात भ्रष्टाचाराचे कुरण वाढल्याचा आरोपही मेटे यांनी केला. मराठा समाजाचे मिळालेले आरक्षण या सरकारने घालविले. शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करते पण दोन वर्षांत त्यांच्या स्मारकाबाबत बैठकीला मुख्यमंत्र्यांनी दोन मिनीटांचाही वेळ दिला नाही.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम ठप्प आहे. सारथीचे काम ढेपाळले आहे. समाजाला नव्याने आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला काम अद्याप दिले नाही. २०१४ साली निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या दिल्या नाही. मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षणाबाबत सरकार चकार शब्द बोलत नाही. ओबीसी आरक्षणाबाबत गळा काढणारे छगन भूजबळ, विजय वडेट्टीवार सरकारमुळेच आरक्षण जाऊनही गप्प आहेत.

धनंजय मुंडे परळीचे पालकमंत्री

नवाब मलिक यांना त्यांचा जावाई, समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्या पुढे जाऊन समाजासाठी काम करायला वेळ नाही, असा टोलाही देखील मेटे यांनी लगावला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही विनायक मेटे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. मुंडेंच्या दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्यात सर्वच घटक अडचणीत आहेत. पालकमंत्री कसा नसावा याच धनंजय मुंडे उदाहरण आहेत.

धनंजय मुंडे यांचे परळीतले ‘उद्योग’त्यांना परळीच्या बाहेर पडायला वेळ मिळू देत नाहीत. जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे इतर आमदारही त्यांना दुसऱ्या मतदार संघात लक्ष घालू देत नसल्याने धनंजय मुंडे परळी मतदार संघाचे पालकमंत्री झाले आहेत. सपना चौधरी, अतिक्रमण, देवस्थान जमिनी हे त्यांचे उद्योग असल्याचा आरोपही मेटे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT