Vanchit Bahujan Aghadi : आपण एखादी गोष्ट मानतो की नाही, हा भाग निराळा. पण इतरांची श्रद्धा असेल तर त्याचा मान राखला पाहिजे या मताची मी आहे. (Prakash Ambedkar Visit Temple) त्यामुळेच भद्रा मारोतीच्या दर्शनाला आलो होतो. इथे मंदिराचे काम सुरू आहे, त्यालाही भेट दिल्याचे सांगत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी आज एकाच दिवशी दोन धक्के दिले.
वंचितच्या कार्यकर्ता, पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज दुपारी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीला भेट देत तिथे फुलं वाहिली. (Aurangabad) त्यानंतर त्यांनी खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शनही घेतले. प्रकाश आंबेडकरांच्या या दोन घटनांची आज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले असतांनाच आंबेडकरांनी अचनाक औरंगजेबाच्या कबरीला भेट देत राज्यातील सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. (Vanchit Bahujan Aghadi) या भेटीचे समर्थन करतांनाच त्यांनी इतिहासाचे दाखले देत पुर्वीचा इतिहास तपासण्याचा सल्ला देखील दिला होता.
भद्रा मारोतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना आंबेडकरांनी इतराच्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे ही आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. कोरोना काळात राज्यातील मंदिरे बंद होती, तेव्हा वंचितने सर्वप्रथम ती उघडली जावीत अशी भूमिका घेतल्याची आठवण देखील आंबेडकरांनी करून दिली. लोकांच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही तेव्हा आंदोलने केली होती, आम्हीच रस्त्यावर होतो. म्हणून माझ्यावर टीका करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही आंबेडकरांनी बजावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.