MNS Chief Raj Thackeray, Raj Thackeray Aurangabad Rally
MNS Chief Raj Thackeray, Raj Thackeray Aurangabad Rally Sarkarnama
मराठवाडा

MNS : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी, पण..; बाळा नांदगावकरांची माहिती

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद :महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची (MNS Cheif Raj Thackeray) येत्या 1 मे (Maharashtra Din) औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. (Raj Thackeray Aurangabad Rally)

मनसेने सभेची जय्यत तयारी (Raj Thackeray Aurangabad Rally) सुरू केली आहे. पण या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. आज सांयकाळपर्यत ही परवानगी मिळेल, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आज सांगितले. नांदगावकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बाळा नांदगावकर म्हणाले, "राज ठाकरे यांच्या सभेला काही अटीशर्तीसह परवानगी मिळणार आहे, राज ठाकरे यांना सभेपूर्वी पोलीस नोटीस देणार आहेत. आज दुपारी किंवा सांयकाळपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे,"

"सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये," अशा स्वरुपाची नोटीस राज ठाकरे यांनी पोलीस देतील,अशी शक्यता आहे. बाळा नांदगावकर यांनी काल (बुधवारी) सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. पोलिसांचीही भेट घेतली होती.

राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. बाळा नांदगावकर यांनी काल औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली आहे. या सभेच्या परवानगीविषयी त्यांच्यात चर्चा झाली.

राजसाहेबांच्या भूमिकेमुळे अनेक नास्तिक आस्तिक झाले आहेत, रामनवमी, हनुमान जंयतीला मंदिरात जाऊन आरती करत होते. (Aurangabad) भगवा झेंडा घेऊन नाचत होते, हा बदल तुम्ही लक्षात घ्या, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी विरोधकांना टोला लगावला.

सध्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्टेजची उभारणीचे काम अंतिम टप्यात आहे.मनसेने या सभेच्या पार्श्वभूमीवर टीझर (MNS Teaser) जारी केला आहे. टीझरमध्ये औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.राज्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टीमेटम आघाडी सरकारला दिला आहे.

औरंगाबाद मध्ये 9 मे पर्यंत सण उत्सव तसंच महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.प्रसारमाध्यमांमध्ये काल (बुधवारी)औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त देण्यात आले होते, पण पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी त्याचं खंडन करत स्पष्टीकरण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT