औरंगाबाद : राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा एका कार्यकर्त्यासोबत डोक्यावर जाळीची टोपी घातलेला फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी शिंदेसेनेच्या हिंदु गर्व गर्जना यात्रेला टोला लगावलाय. (Shivsena) काल झालेल्या मेळाव्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जुम्मे की नमाज को जाना है, म्हणत सत्कार कार्यक्रम रद्द करायला लावला होता. यावर देखील दानवे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून टीका केली.
दानवे यांनी भुमरेंचा एक फोटो ट्विट करत म्हटले आहे की, (Abdul Sattar) सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!! मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना आक्रमक झाली आहे. (Marathwada)
उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवाजीपार्क वरील मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. तर उच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आता शिंदेसेना बीकेसीवरील मुख्यमंत्र्यांची सभा जोरात करण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात आढावा बैठका, मेळावे घेतले जात आहेत.
औरंगाबादेत असाच मेळावा काल पार पडला. या मेळाव्यात भुमरे, सत्तार, शिरसाट या सगळ्यांनीच शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिंदेसेनेवर टीक करण्याची एकही संधी शिवसेना सोडतांना दिसत नाहीये.
अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदेसेनेच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेची खिल्ली उडवण्यासाठी कृषीमंत्री सत्तार यांच्या जुम्मे की नमाज, आणि भुमरेंच्या जाळीदार टोपीचा आधार घेतला आहे. दानवे यांनी ट्विट केलेला फोटो आणि त्यातील मजकुर याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे..
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.