Imtiyaz Jaleel : Chhatrapati Sambhajinagar :  Sarkarnama
मराठवाडा

Imtiyaz Jaleel : 'छत्रपती संभाजीनगर' नामकरण विरोधातल्या जलील यांच्या आंदोलनात 'औरंगजेबाचे' फोटो? ; नव्या वादाला फोडणी!

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचं आंदोलन!

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद नामांतराच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला. यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, छत्रपती संभाजीनगरचे खासदार व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी मात्र या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली.

माझे हे फक्त उपोषण नाही, आगामी काळातल्या मोठ्या आंदोलनाची सुरवात आहे, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. मात्र हे आंदोलन आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे. जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने अजून एका वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवत एमआयएमने औरंगजेबचे फोटो झळकवले. यामुळे आता नामांतरापासून सुरू झालेल्या आंदोलनाला वेगळ वळण लागले आहे.

यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार म्हणाले, "या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध दर्शवणे योग्य नाही. जलील यांनी जनाधार गमावलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांना असं नाटक करावं लागतं, मुस्लिम समाज हा नेहमीचमहाविकास आघाडीच्या बाजूने राहिला आहे. इम्तियाझ जलील यांनी त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब असं का ठेवलं नाही. एआयएमआयएमचे जेवढे नगरसेवक आहे, त्यांनी त्यांच्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवावे. इतिहासात औरंगजेबाने मुस्लिम समाजातल्या लोकांनाही त्रास दिला आहे. औरंगजेबने मंदिरे तोडले, एवढं प्रेम जलील यांना औरंजेबदद्दल कसं वाटायला लागलं?" असे खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT