Phulambri Market Committee, News Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Market Committee : बाजार समितीच्या सत्तेसाठी बागडे-काळेंचा जोर, मात्र आघाडी-युतीचा घोळ मिटेना..

Marathwada : फुलंब्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल १३९ उमेदवार रिंगणात आहेत.

नवनाथ इधाटे

Chhatrapati Sambhajinagar : फुलंब्री विधानसभा मतदारसंघ, जिल्हा दुध संघ, बाजार समित्यासह तालुक्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकी एकमेकांविरुद्ध दंड थोपटणारे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमदार हरिभाऊ बागडे व माजी आमदार तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. फुलंब्री बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी या दोन्ही आजी-माजी आमदारांनी जोर लावला आहे.

मात्र शिंदे-भाजप युती व महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन्ही पक्षांचे अजून काही ठरत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यावा, याची चर्चा उमेदवार थेट मतदारांकडे जावूनच करत असल्याचे समोर आले आहे. (Bjp) फुलंब्री तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल १३९ उमेदवार रिंगणात आहेत.

यातील दोघांनी माघार घेतली असून आणखी किती उमेदवार माघार घेतात हे २० एप्रिल नंतरच स्पष्ट होईल. (Haribhau Bagde) कुठल्याही परिस्थितीत बाजार समितीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी युती-आघाडीने तयारी सुरू केली आहे. आजी-माजी आमदारांकडून या निवडणुकीची सगळी सुत्रं हलवली जात आहेत.

स्वबळावर की आघाडी युती? याचा फैसला अद्याप न झाल्यामुळे दोन्ही नेत्यांनी उमेदवारांना थेट मतदाराच्या भेटीसाठी गावागावात जावून चर्चा करण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जाते. बाजार समितीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा चव्हाण, माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे.

तसेच शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, जिल्हा परिषद माजी सदस्य जितेंद्र जैस्वाल, शिवाजी पाथ्रीकर, माजी सभापती सर्जेराव मेटे, सविता फुके, माजी सभापती पद्माबाई जिवरग, माजी सभापती चंद्रकांत जाधव या दिग्गजांसह इतरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT