Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना महिनाभरात अटक करणार! पोलीसांचा शब्द, कुटुंबियांचे उपोषण स्थगित

Gyaneshwari Munde halts her hunger strike after receiving assurance from police regarding the arrest of the accused. : महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे दाखल करावा. खुनाच्या कटात ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी.

Jagdish Pansare

Mahadev Munde Murder Case : परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना एका महिन्यात अटक करू, असे आश्वासन अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके यांनी दिले. यावर विश्वास ठेवत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी अकरा वाजेपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियासह सुरु केलेले उपोषण स्थगित केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना फोन करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती.

परळी (Parli) येथील महादेव मुंडे यांचे मारेकरी सोळा महिने उलटून गेले तरी सापडत कसे नाहीत? असा सवाल करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबियासह आज सकाळी बीडमध्ये उपोषण सुरु केले होते. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या उपोषणाने प्रशासन हादरून गेले होते. आधीच सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर दाखल झालेले दोषारोपपत्र आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अधिवेशन तापले होते. त्यात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाने सरकारच्या अडचणीत वाढ झाली होती.

महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे दाखल करावा. खुनाच्या कटात ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत. (Beed News) महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागण्यांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. मस्साजोग येथील ग्रामस्थांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. उपोषण फारकाळ लांबू नये याची काळजी घेत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी तातडीने मुंडे कुटुंबियांची भेट घेतली.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करू, आमच्यावर विश्वास ठेवा, असा शब्द अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी मुंडे कुटुंबियांना दिला. यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण तूर्तास स्थगित केले. अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी मुंडे कुटुंबियांना पाणी पाजल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला 16 महिने उलटून गेले, तरीही आरोपी मोकाटच आहेत.

पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. उपोषण स्थगित केल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. एक महिन्यात आरोपीला अटक करू, असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे. त्यांच्या विश्वासाला मान देऊन एक महिन्याची मुदत दिली आहे. आता एक महिन्याचा कालावधी हा शेवटचा असणार आहे. एक महिन्यात आरोपीला अटक केली तर ठीक, नाहीतर पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT