Police Commissioner Nikhil Gupta  Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Police : पोलीस आयुक्त निखिल गुप्ता एक्शन मोडवर; औषध विक्रीवर उगारला बडगा

Aurangabad Police News : तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढू नये यासाठी...

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : पोलीस आयुक्त निखिल गुप्ता एक्शन मोडवर आले असून औषध विक्रीवर त्यांनी बडगा उगारला आहे. आता औषध विक्री केंद्र चालकांनी अंमली पदार्थचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचे आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीची खातरजमा करुन विक्री करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

तसेच विविध भरारी पथकाच्या धाडीतून प्रतिबंध व कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिले. तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढू नये यासाठी जिल्हास्तरीय व शहर समितीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याबरोबरच या संबंधित आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य खबरदारी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन घेत असल्याचे सांगितले.

औषध विक्री केंद्रावरील माहितीचा डेटा संबंधित पोलीस स्टेशनला (Police Station) आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. यासाठी वारंवार औषधी विक्री करणाऱ्या विक्री केंद्रावर भेटी देण्यात येणार आहे. कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्या मार्फत गावपातळीवरील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मदतीने शेतीतील आंतरपिकात गांजा किंवा तत्सम पिकांची लागवडी संदर्भात प्रमाणपत्रासह अहवाल मागविण्याचे निर्देश पोलीस आयुक्त (Police Commissioner) डॉ.निखील गुप्ता (Nikhil Gupta) यांनी दिले.

समाजात व्यसनधिनता वाढू नये म्हणून जाणीवजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन तसेच व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत समपुदेशन करावे. शाळा महविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजनात कलापथक, तज्ज्ञ व्यक्तीच्या मागदर्शनपर मुलाखती समाज माध्यमातून प्रसारित कराव्यात. या उपक्रमातून व्यसनांचे दुष्परिणाम होणारे नुकसान, आरोग्याविषयक आजारावर मार्गदर्शन करुन अंमली पदार्थ सेवनातून होणाऱ्या व्यसनाचे दुष्परिणामाविषयी व्यापक स्वरुपात जाणीव जागृती करावी, असे डॉ.गुप्ता यांनी सांगितले. (Aurangabad Police News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT