<div class="paragraphs"><p>Kirit Somaiya</p><p></p></div>

Kirit Somaiya

 
मराठवाडा

धमक्यांनंतर किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

सरकारनामा ब्युरो

बीड : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडे (ED) तक्रार दाखल केली होती. नंतर त्यांनी आज बीडचा दौराही करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र, त्यांच्या बीड (Beed) दौऱ्यावर येण्याधीच बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. बीड पोलिसांनी जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच किरीट सोमय्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा बीड पोलिसांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना धमकीचे मेसेज आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.

किरीट सोमय्यांनी बीड दौऱ्याची घोषणा केल्यानंतर त्यांना आलेल्या धमक्यांचा फोटो शेअर केला आहे.‘पिलू हे बीड आहे, येथे....मध्ये चटणी भरली जाते, तु ये अन॒ माघारी जा’, ‘तुझ्यासारखा मुर्ख, नादान अन॒...कुणीच पाहीला नाही’ अशा मजकूराची ही धमकीचा स्क्रिीन शॉट किरीट सोमय्यांचा यांनी ट्विट केला. दरम्यान, धमकीनंतर किरीट सोमय्या यांनी दौरा कार्यक्रमात कुठलाही बदल न करता अंबाजोगाई गाठली आणि संत जगमित्र कारखान्याकडे रवाना झाले.

तसेच, ''धनंजय मुंडे घोटाळा, बीड दौऱ्यावर निघालो. पुन्हा धमक्या. आत्ता सकाळी माझा बीड जिल्ह्याचा दौरा सुरू झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंडांना, धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असं ट्वीट करत किरीट सोमय्यांनी त्यांना आलेल्या धमक्यांना उत्तर दिलं आहे. जगमित्र साखर कारखाना घोटाळा आणि शेतकऱ्यांना न्याय हे आमचे ध्येय, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT