Factory Raid In Beed Sarkarnama
मराठवाडा

बीड जिल्ह्यात बनावट खव्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; तीन क्विंटल खाद्यपदार्थ जप्त

(The action was taken under the leadership of Acp Pankaj Kumawat.)केजजवळील उमरी येथे हा खव्याचा कारखाना सुरू होता, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कारखान्यातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

बीड ः जिल्ह्यात अवैध धंद्याना ऊत आलायं, असंच काहीसं चित्र आहे. काही दिवसांपुर्वी बनावट देशी दारू, त्यानंतर गुटखा आणि आता केमिकलयुक्त खवा बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारत जवळपास तीन क्विटंल खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. नुकतीच दिवाळी होऊन गेली, त्यामुळे जिल्ह्यात व इतर भागात या कारखान्यातील केमिकलयुक्त खवा किती जणांच्या पोटात गेला असेल, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

केजजवळील उमरी येथे हा खव्याचा कारखाना सुरू होता, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कारखान्यातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुटख्या विरोधात कारवाई करणारे सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

केज-बीड रोडवर व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण नावाची कंपनी आहे. इथे केमिकल आणि दुध पावडरचा वापर करून खवा व खव्याचे खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी एफडीएचे सहायक आयुक्त सय्यद हश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह इतरांच्या दोन पथकांनी या कंपनीवर छापा टाकला.

येथील खाद्यपदार्थांचे नमुने पथकाने ताब्यात घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या शिवाय तब्बल २ हजार ९५८ किलोचे ५ लाखाहून अधिकचे खाद्यपदार्थ जप्त केले. दरम्यान, सध्या हा कारखाना सील करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT