Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : मंत्री, आमदार, खासदारांच्या घर, कार्यालयावर पोलिसांचा खडा पहारा...

Maratha Protest News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण.

Jagdish Pansare

Marathwada Political News : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागले आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्र्यांबद्दल समाजामध्ये प्रचंड रोष आहे. (Police Protection News) याचे पडसाद आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमटले. माजलगावचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला आंदोलकांनी फोडला, वाहनांची जाळपोळ केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, (Maratha Reservation) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत या सर्वांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या शिवाय या सर्व मंत्री, आमदार, खासदारांच्या संपर्क कार्यालयांनाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. (Marathwada) आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर येथील संपर्क कार्यालयावर दुपारी अडीच वाजता हल्ला झाला होता. (Maharashtra) खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर काही तासांनी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांचे राहते घर आणि तेथील वाहने आंदोलकांनी पेटवून दिली. इकडे संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय संतप्त आंदोलकांनी फोडले. आंदोलकांचा हा रुद्रावतार पाहता पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदारांच्या घर आणि कार्यालयाबाहेर खडा पहारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्व लोकप्रतिनिधींना कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे लोण मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरू नये, यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. लोकप्रतिनिधींची वाहने अडवणे, त्यांना काळे झेंडे दाखवण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू आहेत. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. ही सगळी परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधींनी आवश्य सुरक्षा पुरवण्याचे आदेश सरकारकडून पोलिसांना देण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT