Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Lok Sabha Counting : खबरदार गडबड कराल तर..; ड्रोन पेट्रोलिंग, दंगा काबू पथकासह पोलिस सज्ज

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शहरातील बिड बायपास वरील एमआयटी कॉलेजमध्ये होणार आहे. या मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर तसेच शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान वाहतूकीला अडचण येऊ नये म्हणून बिड बायपास मार्ग अवजड वाहनासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मतमोजणीसाठी नेमण्यात आलेला बंदोबस्त आठ टप्प्यात ठेवण्यात आला आहे. यामध्ये पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 - नवनीत कॉवत हे देखरेख अधिकारी असणार आहे. त्यांच्या मदतीकरीता 3 सहायक पोलिस आयुक्त, 52 पोलिस अधिकारी, 407 पोलिस अमंलदार, 67 महिला पोलिस कर्मचारी, वाहतूक विभागाचे 9 अधिकारी, 54 अंमलदार, तसेच राज्य राखीव दलाच्या दोन प्लाटुन, 500 होमगार्ड नेमण्यात आले आहेत.

यासह शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सतरा पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, शिलवंत नांदेडकर यांच्या देखरेखीखाली फिक्स पॉइंट, पायी पेट्रोलींग, सेक्टर पेट्रोलींग करण्यात येणार असून यामध्ये 2 सहायक पोलिस आयुक्त, 68 अधिकारी, 600 पोलिस अंमलदार तसेच साध्या वेशातील गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथक नेमण्यात आले आहेत.

जिन्सी आणि सिटीचौक पोलिस ठाणे हद्दीत ड्रोन पेट्रोलिंग देखील नेमण्यात आली आहे. यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 11 स्ट्रायकिंग फोर्स, 4 दंगा काबू पथक आणि नियंत्रण कक्षात 2 स्ट्रायकिंग फोर्स नेमण्यात आल्या आहेत. मतमोजणी दरम्यान अवजड वाहनामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊ नये म्हणून 4 जूनला पहाटे 5 वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत जड वाहनासाठी झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

वाहनधारकांनी सोलापूर-धुळे या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मतमोजणी दरम्यान, तसेच नंतर देखील कोणीही कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, कायदा हातात घेतल्यास सबंधीतावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त संदिप पाटील यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT