sitaram ghandat
sitaram ghandat Sarkarnama
मराठवाडा

घनदाटांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पालम नगरपंचायतीत मिळाली सत्ता; भाजप पराभूत

सरकारनामा ब्युरो

परभणी : जिल्ह्यातील एकमेव निवडणुक झालेल्या पालम नगरपंचाय निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. इथे राष्ट्रवादीने (Ncp) भाजपकडून सत्ता हिरावून घेतली. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. (Bjp)राष्ट्रवादीने माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या नेतृत्वाखाली पालम नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. (RSP)

राष्ट्रवादीने १७ पैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर रासपचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा मिळाल्या. पालम नगरपंचायतीवर अनेक वर्षे भाजपाची सत्ता होती, मात्र या निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारल्याचे दिसून आले. इतर एक जागा भाजप पुरस्कृत उमेदवाराने मिळवली आहे.

गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्ह्यात पक्षाला मिळालेला हा मोठा विजय मिळाल्याचे बोलले जाते. पालम नगरपंचायतीतील एकूण १७ पैकी राष्ट्रवादीने १०, रासप ५, भाजपा १, व भाजप पुरस्कृत १ उमेदवार विजयी झाला आहे.

पालम नगरपालिका निवडणुकी दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास पैसे वाटतांना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी विरोधकांनी राष्ट्रवादीवर आरोप करत रान पेटवले होते. मात्र मतदारांनी सत्तेच्या चाव्या याच पक्षाच्या हाती सोपवल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT