Prakash Ambedkar News Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar On Aurangjeb : औरंगजेबाच्या दरबारात कोण होते ? हा इतिहास आधी तपासा..

सरकारनामा ब्युरो

VBA News : औरंगजेबाच्या औलादी शोधणाऱ्यांनी आधी ज्या जयचंद राजामुळे विदेशी लोक या राज्यात आले, त्या जयचंद प्रवृतीच्या लोकांना शिव्या घालाव्यात,औरंगजेबाला नव्हे. (Prakash Ambedkar On Aurangjeb औरंगजेबाच्या दरबारात कोण होते? याचा इतिहास तुम्ही कसा नाकारणार? असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीचे समर्थन केले.

राज्यात १२ दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, नागपूरच्या एसआयटीने तसा अहवाल सरकारला आधीच दिला होता. परंतु जनता राजकारण्यांच्या षडयंत्राला बळी पडली नाही, दोन तासात दंगली आटोक्यात आल्या, असेही आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांनी आज अचनाक खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली. पोस्टर झळकावणारे, स्टेटस ठेवणारे यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले. (Aurangabad) असे असतांना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि त्याचे समर्थनही केले. (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर म्हणाले, औरंगजेबाला शिव्या घालण्याआधी ज्या जयचंदामुळे विदेशी लोक आपल्या राज्यात आले त्यांना शिव्या घाला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात आपल्या भाषणात भूमिका मांडली होती.

आजही राज्यात जयचंद प्रवृत्तीचे लोक आहेत. आधी त्या जयचंद प्रवृत्तीच्या औलादींना शोधा. औरंगजेबाच्या दरबारात कोण होते? हा इतिहास तुम्ही तपासणार की नाही? असा सवाल देखील प्रकाश आंबेडकरांनी केला. ठाकरेंच्या शिवसेनेशी माझ्या पक्षाशी युती असली तरी औरंगजेबाच्या मुद्यावरून त्यांची अडचण होण्याचा प्रश्नच येत नाही. अद्याप माझ्या या भेटीबद्दल त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नसल्याचे आंबेडकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT