Prakash Ambedkar  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : पंकजा मुंडे बहुजन नेत्या असतील तर त्यांनी...; आंबेडकरांचे सूचक आवाहन

Datta Deshmukh

Beed : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. ( Prakash Ambedkar Rally )

पंकजा मुंडे यांनी गेल्या महिन्यात राज्यभरात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे या जनतेत गेल्या. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये देवदर्शन करत त्यांनी ही यात्रा केली आणि या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

यात पंकजा यांनी ज्योतिर्लिंग आणि देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेत त्यांनी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. भाजपमध्ये पंकजा मुंडे या नाराज असल्याने त्यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांना एक सल्ला दिला आहे.

''त्या' बहुजन नेत्या असतील तर...'

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षातून त्रास दिला जात असेल तर हा विषय त्यांच्या पक्षामधील आहे. त्या बहुजन नेत्या असतील तर त्यांनी पक्षाच्या बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

राहुल गांधींवर टीका करत त्यांनी काँग्रेसलाही सल्ला दिला आहे. राहुल गांधींना राजकीय निर्णय घेता येत नाहीत, तर ते नरेंद्र मोदींच्या विरोधात कसे लढणार? असा सवाल केला. आणि राहुल गांधींचे कौतुक करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी त्यांना निर्णय घ्यायचे शिकवावेत, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘लढा वंचितांच्या सत्तेचा’ ही सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची शहरातून भव्य फेरीही काढण्यात आली. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नावरील उत्तरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वरील सल्ला दिला. या वेळी रेखा ठाकूर, अनिल जाधव, अशोक हिंगे, प्रा. विष्णू जाधव उपस्थित होते.

Edited by : Sachin Fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT