VBA Leader Prakash Ambedkar Rally In Nanded News Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar : जाती व्यवस्था मोडल्याशिवाय भारत जोडणे अशक्य..

शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीला शेतकरीही जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे. (Prakash Ambedkar)

सरकारनामा ब्युरो

नांदेड : यंदा कापसाला भाव मिळेल म्हणून शेतकरी डोळे लावून बसलाय. मात्र, हे सरकार शेटजी आणि भटजीचे सरकार आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढणार नाहीत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केली. त्याचबरोबर जाणता राजा हॉस्पीटलमध्ये आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढणार नाहीत, अशी मिश्किल टीकाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय भारत जोडणे अशक्य असल्याचेही ते म्हणाले.

नांदेडला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षापासून टिकून आहे. (Prakash Ambedkar) येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाला तोडू पाहत असून येथील माणसांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Nanded) कॉँग्रेसचे राहुल गांधी यांनी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेचे अभिनंदन पण येथील भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम त्यांनी करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मलेशियातून का तेल मागविले? त्यावर जाब विचारावा. कारण काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर मलेशियाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी मोदींनी मलेशियातून तेल विकत घ्यायचे नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतरही तेल खरेदी झाली असल्याचे सांगत आंबेडकरांनी मोदींवर टीका केली. आगामी काळात पैसे वाटून निवडणुका जिंकणाऱ्या पुढाऱ्यांची व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय पर्याय नाही. हे होत नाही तोपर्यंत वंचित समुहाची सत्ता येणार नाही.

भाजप सरकार हे सामान्यांचे नसून लुटारूंचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीला शेतकरीही जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.

शेटजी आणि भटजी हे मुद्दामहून ऊस असो किंवा कापूस यास भाव देत नसल्याने कापूस व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, त्याच शेतकऱ्याच्या भरवशावर इथेनॉलमधून कारखानदार गब्बर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाला प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव घ्यावा, असे आवाहनही आंबेडकरांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT