Mla Prashant Bamb-Santosh Mane News, Aurangabad
Mla Prashant Bamb-Santosh Mane News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb : बंब यांनी शरद पवारांचे नाव घेतल्याने राष्ट्रवादी आक्रमक, धडा शिकवणार..

सरकारनामा ब्युरो

Ncp News: गंगापूर सहकारी साखर कारखान्याची सत्ता भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यातून गेली. त्यांच्यासह अख्खे पॅनल पराभूत झाल्याने बंब संतापले आहेत.

यातूनच त्यांनी काल आपल्या प्रतिक्रियेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा बारामतीचे काका असा उल्लेख करत गंभीर आरोप केले. त्याचे पडसाद राष्ट्रवादीतून उमटायला सुरूवात झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बंब यांच्या विरोधात लढलेले गंगापूर (Ncp) राष्ट्रवादीचे संतोष माने यांनी त्यांना आव्हान दिले आहे.

एक व्हिडिओ जारी करत माने म्हणाले, बंब (Prashant Bamb) यांना शेतकरी, सभासद आणि नागरिकांनी कारखाना निवडणुकीत धडा शिकवला आहे. खोट बोलून लोकांची दिशाभूल जास्त दिवस चालत नाही, हेच या निवडणुकीतून दिसून आले आहे.

पण पराभवावर आत्मचिंतन करण्याऐवजी बंब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच तोंडसुख घेतले.

बारामतीचे काका असा उल्लेख करत पवारसाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी महाराष्ट्रात लूट केली. त्यांच्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या, सहकार क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार वाढला हे त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि त्यांच्या बुद्धीची कीव वाटावी असे आहेत.

मुळात बंब यांची शरद पवारांचे नाव घेण्याची लायकी नाही. कारखाना सुरू करण्याच्या थापा मारत, मी पैसा लावला हे सांगणारे बंब यांचा हेतू शेतकऱ्यांचे हित हा नव्हता, तर या माध्यमातून त्यांना आपली राजकीय ताकद वाढवायची होती.

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असो की विधानसभा निवडणूक तुम्ही कशी जिकंता हे मतदारसंघातील लोकांना माहित आहे. तुमच्यामुळे हा मतदारसंघ राज्यात बदनाम झाला आहे.

त्यामुळे माझे तुम्हाला आव्हान आहे, की पैशाचा वापर न करता तुम्ही निवडून येवून दाखवा. यापुढे शरद पवारसाहेबांचे नाव घेतले तर तुम्हाला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील माने यांनी दिला आहे.

कारखाना निवडणुकीत झालेल्या पराभवातून बंब काही धडा घेतील असे वाटले होते, पण आता त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही माने यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT