PratapSinh Patil Sarkarnama
मराठवाडा

PratapSinh Patil : संदीप भैय्यांनी स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझी निवडणूक अधिक मनावर घेतली; प्रतापसिंह पाटलांकडून कौतुक!

Pratapsinh Patil praises Sandeep Kshirsagar for his crucial role in the Marathwada Graduate Constituency election victory against Satish Chavan : मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील विजयात संदीप क्षीरसागरांची महत्त्वाची भूमिका; बीडमधील प्रचार यंत्रणेचे प्रतापसिंह पाटलांकडून कौतुक.

Jagdish Pansare

Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी तीन टर्म आमदार असलेल्या महायुतीच्या सतीश चव्हाण यांचा पराभव केला.

पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील पक्ष तर झटलेच पण त्यांना महायुतीतील नाराज घटकांचाही छुपा पाठिंबा मिळाला हे आता लपून राहिलेले नाही. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या विजयात बीड जिल्हा महत्त्वाच्या भूमिकेत राहिला. विशेषत: आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली होती.

जिल्ह्यातील सर्व पदवीधर (Graduate constituency) मतदारांची मते प्रतापसिंह पाटील यांच्या पारड्यात टाकण्यासाठी क्षीरसागर यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत मोलाची कामगिरी निभावली. आमदार झाल्यानंतर प्रतापसिंह पाटील यांनी निवडणुकीत त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे.

याच दरम्यान त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली. क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. 'संदीपभैय्यांनी स्वतःच्या निवडणुकीपेक्षाही माझी निवडणूक अधिक मनावर घेतली. निवडणुकीची धुरा सांभाळत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अथक परिश्रम केले.

त्यांच्या खंबीर साथीमुळे बीड परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले', अशा शब्दांत डॉ. पाटील यांनी संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले. साथ मोलाची, ऋण जिव्हाळ्याचे, असे म्हणत त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे कौतुकही केले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यापासून संदीप क्षीरसागर कामाला लागले होते.

क्षीरसागर यांच्या भाषणाची चर्चा..

बीड मधील एका पदवीधर मतदारांच्या मेळाव्यातील त्यांच्या भाषणाची चर्चा प्रचारादरम्यान चांगली चांगली होती. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडे हेही होते. हा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात त्याचा संदर्भ देत फोटोतील या एका व्यक्तीमुळे आपला विजय निश्चित झाला होता असा टोला क्षीरसागर यांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT